नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) धनुष्यबाण (Bow Arrow) चिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Andheri By Election 2022) धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वेत पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान आता आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा झटका बसला आहे. (election commission of india frozen bow arrow symbol for temporary basis big blow to eknath shinde and uddhav thackeray group before andheri by election 2022)


धनुष्यबाण चिन्ह मिळावं, यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही गट आग्रही आणि आक्रमक होते. मात्र आता पोटनिवडणुकीपर्यंत धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाने हा तात्पुरता निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेना हे नाव दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याची माहिती ही मिळत आहे. तसेच येत्या सोमवारपर्यंत नव्या चिन्हाची निवड करावी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. या निर्णयामुळे आता ठाकरे गटाला पोटनिवडणुकीत नव्या चिन्हासह उतरावं लागणार आहे.