Mira Bhayander Municipal Corporation : आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी अधिकारी निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन होतात, अशा परिस्थितीत त्यांना कोणताही निर्णय घ्यायचा असेल किंवा कोणताही आदेश काढायचा असेल, तर त्यासाठी त्यांना आधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. परंतु, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता दीपक खंबित यांनी याकडे दुर्लक्ष करून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 46 अधिकाऱयांच्या अभियोग्यता चाचणीचे आदेश दिले. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी त्यांचे सिविक ॲप बंद ठेवल्याने निवडणूक यंत्रणेवरही परिणाम झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक हंबित यांनी 26 एप्रिल रोजी हा आदेश जारी केला असून, हा आदेश जारी करण्यासाठी निवडणूक आयोगाला ना माहिती देण्यात आली होती ना परवानगी घेण्यात आली होती. संजय ठाकूर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केल्यावर ही बाब उघडकीस आली. 


त्यानंतर निवडणूक आयोगाने शहर अभियंता दीपक यांच्याकडे उत्तर मागितलं. आचारसंहितेचा भंग झाल्यास कोणतीही हलगर्जी केली जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले असले तरी आगामी काळात याप्रकरणी निवडणूक आयोग काय कारवाई करतो, हे पाहावे लागेल.