मुंबई : आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी. (Mumbai ) मुंबईकराचं वीजबिल (Electricity Bill) पुढच्या वर्षी थेट 50 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. खारघर-विक्रोळी दरम्यान नव्या वीजवाहिनीचं काम सुरु आहे. त्यासाठी अतिरिक्त पारेषण शुल्क वसूल करण्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं मंजुरी दिली आहे. (Electricity bill will increase in Mumbai )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कामासाठी येणारा 2 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मार्च 2022 मध्ये या वाहिनीचे काम पूर्ण होईल त्यानंतर हा खर्च थेट मुंबईकरांकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळे मुंबईकरांचे वीजबिलात थेट 50 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.



अदानी ट्रान्समिशन लिमिटेडकडून या वाहिनीची उभारणी सुरू आहे. येत्या काळात दैनंदिन वीज मागणी पाच हजार मेगावॉटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. यासाठीच अतिरिक्त वीज पारेषण वाहिन्या उभ्या केल्या जात आहेत. 


काही महिन्यांपूर्वी मुंबईसह उपनरातील वीज गायब झाली होती. ब्लॅकआऊटचा सामना करावा लागला होता. त्यावेळी राज्य सरकारने यापुढे असे काही संकट ओढवू नये, म्हणून खबदारी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार खारघर-विक्रोळी दरम्यान ही नवीन वीजवाहिनी टाण्यात येणार आहे.