मुंबई : राज्यातल्या वीजग्राहकांवर एप्रिल २०२० पासून दरवाढीची टांगती तलवार आहे. त्यातच महावितरणने इंधन समायोजन आकाराच्या रूपाने जानेवारीत वीजवापरापोटी प्रतीयुनिट ५५ पैसे ते १ रूपया ४० पैशांचा भार ग्राहकांवर टाकलाय. त्यामुळे आता ग्राहकांना येत्या महिन्यापासून मासिक वीजबिलांमध्ये साधारण २०० ते ३०० रूपये अतिरिक्त मोजावे लागतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वार्षिक दरवाढीच्या प्रस्तावावर वीज नियामक आयोग निर्णय घेणार आहे. त्याआधी ऑक्टोबर २०१९ मधील वीजखरेदीवरील जादा खर्चापोटी इंधन समायोजन आकार वसूल करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.  


मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने ५९२७ कोटी रुपयांच्या वीजदरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सामान्य घरगुती ग्राहकांचा वीजदर हा ८ टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. 


३०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र दरवाढीतून वगळण्याची मागणी महावितरणने केली आहे.