Elephanta Boat Accident: बुधवारी गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) इथून एलिफंटा (Elephanta) च्या दिशेनं निघालेल्या नीलकमल नावाटच्या बोटीला उरणजवळी (Uran) करंजा (Karanja) इथं अपघात झाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नौदलाच्या पेट्रोलिंग स्पीड बोटनं धडक दिल्यामुळं ही पर्यटकांना नेणारी बोट बुडाली ज्यानंतर याप्रकरणी नौदलाच्या बोटीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या भीषण दुर्घटनेनंतर ती स्पीड बोट नौदलानं टो करून नेली असून पोलिसांकडून त्या बोटीची पाहणी आणि तपासणी करण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार नेव्ही स्पीड बोटमध्ये एकूण सहा जण असून त्यातील तिघे मृत असून 1 जण गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.  या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर पोहोचला असून, 2 जखमी, 2 बेपत्ता असून एकूण 90 हुन जास्त जणांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्यांना सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 


एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांची नावं 


  • महेंद्रसिंग शेखावत ( नेव्ही)

  • प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार)

  • मंगेश(NAD बोट वरील कामगार)

  • मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट)

  • राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट)

  • साफियाना  पठाण मयत महिला

  • माही पावरा मयत मुलगी वय-३ तीन

  • अक्षता राकेश अहिरे 

  • मिथु राकेश अहिरे वय- ८ वर्षे 

  • दिपक व्ही.

  • अनोळखी मयत महिला

  • अनोळखी मयत महिला

  • अनोळखी पुरुष


(आतापर्यंतच्या माहितीनुसार एकूण 7 पुरुष, 4 महिला, 2 बालक)


हेसुद्धा वाचा : Elephanta Boat Accident: बोट नेमकी कशी उलटली? मालकाने सांगितला सगळा घटनाक्रम; 3.15 वाजता...


 


मदतीचा हात...


मुंबईतील बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.


दरम्यान, एलिफंटाला जाणाऱ्या फेरी बोटचा अपघात आणि त्यानंतरच्या परिस्थितीची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी संपर्क साधत बचावकार्याची माहिती घेतली.