एलफिन्स्टन दुर्घटना : शर्मिला ठाकरेंनी घेतली रोहित परबच्या कुटुंबियांची भेट
एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रोहीत परब आणि जखमी असलेल्या आकाश परब या दोन्ही भावांच्या कुटुंबियांची भेट आज शर्मिला ठाकरे यांनी विक्रोळीत घेतली.
मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रोहीत परब आणि जखमी असलेल्या आकाश परब या दोन्ही भावांच्या कुटुंबियांची भेट आज शर्मिला ठाकरे यांनी विक्रोळीत घेतली.
परब कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्यांनी या घटनेत मृत्यू पावलेल्या मृतांच्या परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी आपण करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
एलफिन्स्टन रोड दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असून बुलेट ट्रेन महाराष्ट्रात आणण्यापेक्षा पहिली मुंबईतील रेल्वे सुविधा नीट करा अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरेंनी दिली आहे.
एलफिन्स्टन दुर्घटनेचा जाब विचारण्यासाठी मनसेकडून रेल्वेच्या चर्चगेट येथील कार्यालयावर धडक मोर्च्याचे ५ ऑक्टोबर रोजी आयोजन केले आहे. यामध्ये मनसे कार्यकर्ते आणि मुंबईतील रेल्वे प्रवासीही सहभाग घेणार आहेत.