रेल्वे स्टेशनवर सरकते जिने २४ तास सुरू राहणार
मुंबईतल्या रेल्वेप्रवाशांना दिलासा देणारी सर्वात महत्त्वाची बातमी... रेल्वे स्टेशनांवरील सरकते जिने आता २४ तास सुरु राहणार आहेत.
मुंबई : मुंबईतल्या रेल्वेप्रवाशांना दिलासा देणारी सर्वात महत्त्वाची बातमी... रेल्वे स्टेशनांवरील सरकते जिने आता २४ तास सुरु राहणार आहेत.
दादर, ठाणे आणि कल्याण या तीन स्टेशनांवर तातडीने याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. या स्टेशनांवरुन अनेक एक्सप्रेस रेल्वे थांबतात. मात्र, सरकते जिने रात्री १० नंतर बंद होत असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत होते. त्यातही वयस्कर व्यक्तींना सामान घेऊन जाताना खूपच त्रास होत असे...
या संबंधात झी २४ तासनं राबवलिलेया मोहिमेनंतर खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याची दखल घेतली असून, या संबंधात सरकते जिने २४ तास सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर इतर उपनगरीय स्टेशनावंरही पहिल्या लोकलपासून शेवटच्या लोकलपर्यंत हे जिने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकते जिने रात्रीच्या वेळी बंद असल्यानं प्रवाशांनचे कसे हाल होतात, हे झी २४ तासनं दाखविले होते, त्याची दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीनं हे जिने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. झी २४ तासच्या बातमीनं मुंबईतील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.