मुंबई : श्री सिद्धिविनायक भाविकांसाठी आनंदाची बातमी... एल्फिन्स्टन रोड स्टेशनपासून श्री सिद्धिविनायक मंदिर अशी मोफत बस सेवा आजपासून सुरू झालीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा गर्दी विचारात घेऊन दर आठवड्याला सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ या वेळेत एल्फिन्स्टन रोड स्टेशनपासून श्री सिद्धिविनायक मंदिर अशी मोफत बस सेवा असणार आहे.


श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास आणि बेस्टने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतलाय. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.


ही बस सेवा भाविकांसाठी मोफत असली तरी या सेवेचा खर्च श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास उचलणार आहे.