मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने अलाहाबाद रेल्वे स्टेशनमधील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. चार वर्षांपूर्वी अशीच काहीशी घटना अलाहाबादमध्ये घडली होती. ही दुर्घटनाही फुटओव्हर ब्रिज कोसळल्याच्या अफवेने घडली होती.


अलाहाबादमधील घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१३ मध्ये अलाहाबादमध्ये कुंभमेळा सुरु होता. ११ फेब्रुवारीला मौनी अमावस्येचे स्नान होते. यावेळी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कुंभमेळ्यामुळे अलाहाबाद स्टेशनवर यात्रेकरुंची मोठी गर्दी होती. 


संध्याकाळी ६.३० वाजता पॅसेंजर ट्रेनची घोषणा झाली. त्यामुळे ट्रेन पकडण्यासाठी संपूर्ण प्रवासी प्लॅटफॉर्म सहाच्या दिशेने निघाले. यावेळी फुटओव्हर ब्रिज तुटल्याची अफवा पसरली आणि एकच कल्लोळ उठला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांचा मृत्यू झाला. यात २६ महिला, ९ पुरुष आणि एका मुलाचा समावेश होता.