मुंबई : एल्फिस्टन येथे घडलेल्या चेंगराचेंगरी नंतर रुग्णालयात मृतांच्या कपाळावर क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरुन केइएम रुग्णालयालाही कारणे दाखवा बजावण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयानं केईएमला ही नोटीस बजावलीय. या संदर्भात 18 जानेवरीपर्यंत उत्तर देण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिलेत. 29 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 लोकांचा मृत्यू झाला होता. 


कुठल्याही परिस्थितीत मृतदेहांचाही मान राखला जायला हवा... डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना कपाळावर स्केचपेननं नंबर टाकल्याची राज्य सरकारची माहिती आज न्यायालयात देण्यात आली. 


जाब विचारणाऱ्या नातेवाईकांवर पोलिसांनीकडून केसेस दाखल होणं धक्कादायक असल्याचंही निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे. 


मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचे कान उपटले असून, आपातकालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी यंत्रणा अजून सक्षम करण्याची गरज असल्याचं न्यायालयाने म्हटले आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.