मुंबई : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लोकांच्या वाहतूकीवर बंधन येणं गरजेचं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. त्या कलरचा स्टिकर असलेली वाहनेच रस्त्यावर धावू शकतील असा निर्ण्य घेण्यात आला होता. आता हा निर्णय मुंबई पोलिसांनी रद्द केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्हिडिओ संदेशद्वारे मुंबईत कलर कोड सक्तीची घोषणा केली होती. संचारबंदीच्या काळातही मुंबईतील रस्त्यावर वाहनांचा मुक्त संचार कमी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत,  
अत्यावश्यक सेवेतील वाहने - पिवळा
मेडिकल सेवा पुरवणारी वाहने - लाल
भाजीपाला वाहनांसाठी  - हिरवा
असे कलर कोड निश्चित केले होते. हे स्टिकर नसलेल्यांची नाक्यावर तपासणी केली जात होती.



काय आहे नवीन नियम


आता मुंबई पोलीस यांनी कलर कोड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू विनाकामानिमित्त होणाऱ्या वाहतूकीची कडक तपासणी केली जाईल. 



कलर कोडचा निर्णय गेल्या आठवड्यात शनिवारी (17 एप्रिल) रोजी घेण्यात आला होता.



मुंबई पोलिसांचा स्टिकरचा निर्णय 7 दिवसात रद्द करण्यात आला आहे. वारंवार बदलणाऱ्या लोकांमध्ये गोंधळ होत असल्याची माहिती मिळतेय.