मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीने या नोटीसमधून जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने मागील महिन्यात खडसेंची प्रॉपर्टी जप्त केली होती. हीच जप्त करण्यात आलेली मालमत्ता रिकामी करण्यासाठी इडीने नोटीस दिली आहे. (enforcement directorate issues notice to ncp senior leader eknath Khadse notice to vacate confiscated property)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीने गेल्या महिन्यात खडसेंचा लोणावळ्यातील बंगला, उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील 3 फ्लॅट आणि 3 मोकळे भूखंड जप्त केले होते. या जप्त केलेल्या एकूण प्रॉपर्टीची किंमत ही बाजार भावानुसार किंमत 5 कोटी 73 लाख रुपये इतकी आहे. ईडीने दिलेल्या नोटीशीनुसार, 10 दिवसांमध्ये मालमत्ता रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.