मुंबई: भगवतगीतेत फेरफार करण्याचा शहाजोगपणा इस्कॉनने केलाय. भगवतगीता अॅज इट इज या मराठी अनुवादात हा प्रताप करण्यात आलाय. भक्तीवेदांत बुक ट्रस्ट, हरे कृष्ण लँडने प्रकाशित केलेली इंग्रजीतली 'भगवतगीता अॅज इट इज' आणि त्याचा मराठी अनुवाद करताना त्यामध्ये बदल करण्याचा शहाजोगपणा इस्कॉनने केलाय. या गीतेत चक्क श्लोक बदलण्यात  आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या अध्यायातील अठरावा, एकोणिसावा श्लोक, तसंच २० ते ४६ श्लोकांमध्ये बदल करण्यात आलेत. दुसऱ्या अध्यायातील २९ वा श्लोक, दहाव्या अध्यायातील १४ वा श्लोक, १२ व्या अध्यायातील पहिला श्लोक, १८ व्या अध्यायातील ५९ व्या श्लोकात अक्षम्य चुका करण्यात आल्या आहेत. 


तत्पूर्वी गुरुवारचा दिवस भगवत गीतेसंदर्भातील आणखी एका वादामुळे गाजला. नॅकचे A आणि A+ चे नामांकन असलेल्या मुंबईतील महाविद्यालयात भगवत गीतेचे वाटप करावेत असा आदेश उच्च शिक्षण विभागाने काढला आहे. यावर साहजिकच विरोधकांनी टीकेची झोड उठवली. उच्च शिक्षित असलेल्या तावडे यांना आणि त्यांच्या सरकार हिंदुत्ववादी धोरण राबवायचे आहे ते यावरून स्पष्ट होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.