`एस्सेल ग्रुप`च्या कोव्हिड हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
`एस्सेल ग्रुप`च्या (Essel Group) कोव्हिड हॉस्पिटलचे (Covid Health Centre) उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते व्हिसीद्वारे करण्यात आले.
ठाणे : 'एस्सेल ग्रुप'च्या (Essel Group) कोव्हिड हॉस्पिटलचे (Covid Health Centre) उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते व्हिसीद्वारे करण्यात आले. कोरोनाबाबत (Coronavirus) जनजागृती गरजेची असून लस आली तरी काळजी घ्यावीच लागणार आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ठाण्यातील बोरीवडे मैदानात ३०० पेक्षा सास्त खाटांचे कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटल एस्सेल ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि झी एंटरटेंनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे एमडी पुनीत गोयंका (Punit Goenka) उपस्थित होते.
यावेळी पुनीत गोयंका यांनी महाराष्ट्र सरकारचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे आभार मानले. झी समूहाच्या माध्यमातून कोव्हिडवर मात करण्यासाठी मदत होणार आहे. उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी संवाद साधताना मला आनंद झाला आहे. त्यांनी आम्हाला कोरोनाच्या काळात जनतेची सेवा करण्याची संधी दिली. त्यांच्या सन्माननीय कार्यालयाने केलेल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक आहे. झी समूहाच्यामाध्यमातून समाजासाठी एक चांगले काम करता आले आहे. हा बदल नक्कीच चांगला आहे. यातून चांगलेच परिवर्तन होण्यास महत्वपूर्ण बाब ठरणार आहे, असे झी एंटरटेंनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे एमडी पुनीत गोयंका (Punit Goenka) म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी आम्हाला कोव्हिड काळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद दिले.