Essel World Bird Park Reopen | भारतातील पहिले विदेशी पक्षी उद्यान नागरिकांसाठी होणार खुले, 500 पक्ष्यांच्या प्रजातींना येणार पाहता
प्रसिद्ध एस्सेल वर्ल्ड `बर्ड पार्क` सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु, पक्षीप्रेमींना पुन्हा अनुभवता येणार पक्ष्यांचा किलबिलाट
मुंबई - जगभर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील पर्यटन स्थळावर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यावर्षी कोरोनाचा प्रसार कमी होताच राज्यसरकारने अनेक पर्यटन स्थळांवरची बंदी उठवली. निर्बंधाच्या शिथिलतेनंतर पक्षीप्रेमीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारे एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्क सुद्धा पुर्ववत करण्यात आले आहे. राज्यातील आणि जगभरातील पक्षप्रेमींना पुन्हा एकदा विविध पक्ष्यांच्या प्रजातींना पाहता येणार आहे.
एस्सेल वर्ल्ड 'बर्ड पार्क' हे भारतातील पहिले विदेशी पक्षी उद्यान आहे. या उद्यानात सुमारे 500 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींना ठेवण्यात आले आहे. तर जगभरातील 50 हून अधिक दुर्मिळ प्रजातीचे पक्षी या संग्रहालयात ठेवण्यात आलेत. मुंबईतील गोराई परिसरात वसलेल्या या उद्यानात देशातीलचं नव्हे तर विदेशातील पक्ष्यांना राहता येईल असे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे. Blue Gold Macaw,African Gray Parrot,Rainbow Lorikeet असे विविध प्रजातीचे पक्षी तुम्हाला या उद्यानात पाहता येणार आहेत.
- एस्सेलवर्ल्ड बर्ड पार्कमधील मुख्य आकर्षण
3 मीटर (9.8 फूट) व्यासाचे पान असलेले व्हिक्टोरिया लिली फुल मुख्य आकर्षण आहे, लहान मुले या फुलावर बसू शकतात
भारतात अत्यंत दुर्मिळ असलेली १४५ दशलक्ष वर्षांपूर्वीची ज्युरासिक-काळातील वनस्पती 'ट्री फर्न' हे बर्ड पार्कमध्ये लावण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्य फूल द प्राईड ऑफ इंडिया (लेजरस्ट्रोमिया स्पेसिओसा) हे प्रमुख आकर्षण या उद्यानाचे आहे.
नैसर्गिक वाळवंट पर्यटकांना अनुभवता यावा यासाठी 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या कॅक्टसची(निवडूंगाची) लागवड करण्यात आली आहे.
या उद्यानात तुम्ही कुटुंबियासमवेत निवांत वेळ घालवू शकाल. तसेच या उद्यानात तुम्ही पक्ष्यांच्या सोबत फोटो सुद्धा क्लिक करु शकाल तसेच पक्ष्यांना अन्न सुद्धा भरवू शकाल. विशिष्ट दुर्बिणाचा वापर करुन तुम्हाला पक्ष्यांचा बारीक हालचालींना सुध्दा टिपता येईल अशी सोय उपलब्ध करुन देण्यात आली. जर तुम्ही कुटुंबियासमवेत वींकेडसाठी प्लॅन करत असाल तर नक्की या एस्सेल वर्ल्ड 'बर्ड पार्क'ला भेट द्या. गजबजलेल्या या शहरात तुम्हाला निसर्ग सानिध्याचा आंनद घेता येईल.