मुंबई : पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुंबई पोलीस फाऊंडेशनची स्थापना करण्यात आलीय. कर्तव्यावर असणाऱ्या मुंबई पोलिसांना खासगी जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी 'मुंबई पोलीस फाऊंडेशन धर्मादाय संस्थेची नुकतीच स्थापना केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संस्थेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्याबरोबर पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य, शिक्षण, स्पर्धा परीक्षा आदींची मदत मिळणार आहे. पोलिसांच्या नातेवाईकांना मुख्यत: आजारपणांमुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असते.


 या कामासाठी लागणाऱ्या निधीची जबाबदारी टाटा ट्रस्टने स्वीकारली आहे. याकरिता दि. १० मे रोजी मुंबई पोलीस, पोलीस फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार झाला.