मुंबई : १ मे २०१५ रोजी मोदी सरकारने मुंबई आणि बंगळुरुचा प्रस्ताव फेटाळून IFSC केंद्र अहमदाबादच्या गिफ्ट सिटीमध्ये स्थापन करायचे ठरवले. यानंतर हा विषय चर्चेत आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. IFSC च्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला धक्कादायक खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलेट ट्रेनची मागणी मुंबईकरांनी कधीच केली नाही. आणि जर मुंबईकरांना बुलेट ट्रेन हवी असेल तर ती मुंबई-पुणे, मुंबई-नागपूर अशी करतील. ती अहमदाबादसाठी कशाला आग्रही राहतील? असा सवाल यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी विचारला. बुलेट ट्रेनचा घाट हा अहमदाबादचं महत्व वाढवण्यासाठी होतं. तसेच जर ही बुलेट ट्रेन करायची आहे तर गुजरात सरकार आणि केंद्र सरकारने करावी. महाराष्ट्राचे पैसे का आमचे घालतात? असा सवाल यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला. 



बुलेट ट्रेनकरता महाराष्ट्राची जमीन जाणार. आदिवासींच्या जमिनीतून हा प्रोजेक्ट करणार आहेत. तिथे कुणी धंदा करणार आहे का? असा सवाल देखील यावेळी विचारण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. हॉस्पिटल्स काढले पाहिजेत. पण याकडे लक्ष न देता बुलेट ट्रेनचा मुद्दा पुढे आणला जातोय. तसेच बुलेट करता कमी दरात कर्ज काढलं जात आहे. असं सतत सांगण्यात येत आहे. पण हे कर्ज आहे हे विसरता कामा नये. तसेच हे कर्ज पुढील तीन पिढ्यांना फेडावं लागणार आहे. असं देखील पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. (IFSC: त्यावेळी फडणवीस सरकार मोदींना घाबरून गप्प बसले; काँग्रेसचा पलटवार) 


 


बुलेट ट्रेनला माझा विरोध आहे. जपानकडून का ट्रेन विकत घेत आहात? आपल्या इंजिनिअर्सना ते तयार करू द्याना? असा मुद्दा देखील चव्हाणांनी या चर्चेत अधोरेखित केला.