EXCLUSIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
- देशात भाजपला बहुमत येईल. एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल. महाराष्ट्रात आम्ही ४० च्या पुढे जावू.
- विधानसभा निवडणुकीतही आम्हाला बहुमत मिळेल.
- मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल.
- वर्ध्यात मोदींच्या सभेला १ लाख लोकं होती. काही लोकांनी आधीचे फोटो पसरवले.
- पंतप्रधान मोदींचा झंझावात कायम आहे. फक्त तो पश्चिम बंगाल सारख्या इतर राज्यातही आता दिसेल.
- ५ वर्षापासून मोदीजी घरी थांबले नाहीत. त्यांना छोट्यात छोट्या व्यक्तीच्या पत्राला उत्तर दिलं आहे.
- महागठबंधनचा काहीही परिणाम होणार नाही. लोकं हुशार आहेत. पहिल्या दिवशी महाआघाडीचे नेते हातात हात घेऊन फोटो काढतात आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांना हे धक्के देतात. लोकं यांना स्विकारणार नाही.
- राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर आहोत. मोदींनी सुरक्षेच्या बाबतीत घेतलेली ठाम भूमिका ही आम्ही लोकांसमोर ठेवत आहोत.
- जास्तीत जास्त महिला नेत्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्ष विचार करतो आहे.
- काँग्रेसने तयार केलेल्या पोकळीमुळे बहुजन वंचित आघाडी तयार झाली. या आघाडीचा आम्हाला फायदा होईल असं नाही. याचा राजकारणात कधी उपयोग होतो कधी दुरुपयोग ही होतो.
- नरेंद्र मोदींनी ज्या योजना आणल्या तेव्हा त्या योजना देताना आम्ही विचारलं नाही, ते हिंदू आहे की मुस्लीम. काँग्रेसने ५० वर्ष मुस्लिमांना फसवलं.
- काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधानची मागणी होत आहे. मत मिळवण्यासाठी कदाचित काँग्रेची बौधिक दिवाळखोरी निघाली की काय असा प्रश्न पडतो.
- राहुल गांधी दिवसात ३ वेळा आकडे बदलतात.
- आम्ही निवडणूक जिंकलो तर ईव्हीएम घोटाळा, ते जिंकले तर ईव्हीएम चांगला. त्यांचे आकडे खरे आमचे खोटे. त्यांच्याकडे मुद्देच नाहीत.
- महाराष्ट्रात २० लाखापेक्षा जास्त ईपीएफओ अकाऊंट तयार झाले आहेत.
- पाऊस पडला नाही त्यामुळे पाणीसाठा ३ महिने पुरेल इतकाच आहे.
- जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्रात आज मोठा दुष्काळ पडला असता. नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नाही. पण आपत्ती आल्यावर त्याचा सामना कसा करायचा हे आपल्या हातात आहे. जलयुक्त शिवारामुळे अनेकांना फायदा झाला.
- शेतकरी कर्जमाफी केली, मराठा समाजाची मागणी पूर्ण केली. धनगर समाजाच्या प्रश्न सोडवत आहोत.
- काही लोकांना आंदोलनात जाणीवपूर्वक उतरवण्यात आलं. योग्य वेळी पुरावे देईल. पण सध्या मी ते देत नाही कारण परिस्थिती बिघडू नये.
- जो देतो त्याच्याकडे लोकं जातात पण या काळात आंदोलन झाली. मोर्चे निघाले. आधीच्या सरकारने सोडवले नाही म्हणून आमच्याकडे आले.
- काही जण जातीयता तयार करत आहेत. त्यांना वाटत नाही की हा प्रश्न सुटावा. २ समाज समोरासमोर यावे आणि भडका उडावा यासाठी काही जण प्रयत्न करत होते. जातियता वाढवण्याचा प्रयत्न झाला.
- म्हाडा, बारामती, मावळची जागा आम्ही जिंकणार.
- पवार साहेब आता भाषण करताना रिटायरमेंटच्या भूमिकेत दिसतात.
- पवार साहेब मोठे नेते आहेत पण आज दुर्दैवाने किंवा सुदैवाने म्हणा. जनता त्यांच्यासोबत नाही आहेत. नेतृत्व त्यांच्याकडे द्यायला तयार नाही.
- नागपूर उच्च न्यायालयात राज्य सरकारने एफिडेविट दिले आहे. त्यामुळे जे भ्रष्ट आहेत ते आता जातील. अशा प्रकारच्या खटल्यांना वेळ लागतो.
- मोदीजी मुख्यमंत्री असताना शरद पवार हे कृषीमंत्री होते. तेव्हा ते गुजरात जायचे आणि तिकडे मदत करायचे. म्हणून मोदींनी त्यांच्याकडून शिकायला मिळालं असं म्हटलं.
- शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाही. राष्ट्रवादी हा पक्ष भ्रष्टाचारामुळे बदनाम झाला. त्यामुळे आम्ही ते म्हटलं.
- किरीट सोमैयांच्या उमेदवारीला शिवसेना जबाबदार असं म्हणणं योग्य नाही. काही इतर गोष्टी देखील असतात.
- विधानसभेला ९० टक्के कार्यकर्त्यांना तिकीट दिले. बाहेरच्यांना १० टक्के उमेदवारी दिली आहे.
- पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवून लोकं भाजपमध्ये आले आहेत.
- जे आमच्या सोबत जोडले त्यांना लक्षात आलं की हा किती व्यापक पक्ष आहे.
- पक्षामध्ये काम केल्यानंतर पक्षाचे आचार आणि विचारामध्ये हे नेते स्वत:ला जुळवून घेतील आणि काम करतील.