Rs 240 Crore Valentine Day Gift: 240 Crore चं Valentine`s Day Gift! पत्नीला दिलं सर्वात महागडं गिफ्ट; मुंबईशी खास कनेक्शन
Expensive Gift On Valentine Day Worth Rs 240 Crore Rupee: व्हॅलेंटाइन्स डेला आपल्या प्रिय व्यक्तीला एखादं गिफ्ट देत प्रेम व्यक्त केलं जातं. मात्र एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी तब्बल 240 कोटींचं गिफ्ट दिलं आहे.
expensive gift on valentine day: आज जगभरामध्ये व्हॅलेंटाइन्स डे (valentine day) साजरा केला जात आहे. या दिवशी प्रत्येकजण आपल्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. खास करुन गिफ्टच्या (gift on valentine day) माध्यमातून अनेकजण आपल्या जोडीदाराबद्दलचं प्रेम व्यक्त करतात. असं असतानाच सध्या एक महागडं गिफ्ट यंदाच्या व्हॅलेंटाइन्स दिनानिमित्त चर्चेत आहे. या गिफ्टची किंमत आहे तब्बल 240 कोटी रुपये इतकी आहे.
ही भेट मुंबईमधील एका उद्योजकाने आपल्या पत्नीला दिली आहे. या व्यक्तीने पत्नीला दिलेल्या गिफ्टचा यावरुन अंदाज बांधता येईल की या गिफ्टची किंमत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या घरापेक्षाही जास्त आहे. जाणून घेऊयात या गिफ्टबद्दल...
कोणी दिलं आहे हे गिफ्ट
हे गिफ्ट वेलस्पन ग्रुपचे (welspun group) बी. के. गोएंका (bk goenka) यांनी आपल्या पत्नीला दिलं आहे. गोएंका यांनी मुंबईत 240 कोटींचं घर विकत घेतलं आहे. विशेष म्हणजे ही किंमत रतन टाटा यांच्या राहत्या घरापेक्षा अधिक आहे. रतन टाटांचं आताचं घर हे 150 कोटींचं आहे. हे पेंटहाऊस मुंबईतील वरळीमध्ये आहे. हे एक ट्रीपल डेकर पेंटहाऊस आहे. हे घर वरळीमधील थ्री सिक्सटी वेस्ट बिल्डिंगच्या 63 व्या, 64 व्या आणि 65 व्या मजल्यावर आहे. हे घर बी. के. गोएंका यांनी त्यांची पत्नी दीपाली यांना गिफ्ट केलं असल्याचं सांगितलं जात आहे.
घराचा एरिया किती?
वरळीतील Three Sixty West या अॅनी बेझंट मार्गावरील प्रोजेक्टमधील टॉवर B मध्ये असणाऱ्या या घराचं क्षेत्रफळ तब्बल 30,000 चौरस फूट असल्याचं सांगण्यात आलं आहे. गोएंका दांपत्य या घरात राहण्यास येणार असल्याचं समजतं. यापूर्वी 2015 मध्ये जिंदाल कुटुंबाने 150 कोटींचं घर विकत घेतलं होतं. या घराचं क्षेत्रफळ 10 हजार स्वेअर फूट इतकं होतं.
नक्की वाचा >> 21000 कोटींची मालकीण! सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत असणारी ही भारतीय महिला आहे तरी कोण?
कोण आहेत गोएंका?
बी. के. गोएंका हे वेल्सपन ग्रुपचे मालक आहेत. त्यांची कंपनी टेक्सटाइल, स्ट्रील, इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्यूएबल एनर्जी, वेअरहाऊसिंग आणि ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये काम करते. मूळचे हरियाणामधील हिसारमध्ये राहणाऱ्या बी. के. गोएंका यांनी 1985 मध्ये कंपनी सुरु केली. आता ही कंपनी 50 देशांमध्ये काम करते. 'फोर्ब्स'च्या यादीनुसार बी. के. गोएंका यांची एकूण संपत्ती 1.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1 खर्व रुपये इतकी आहे.
दीपाली गोएंका आशियातील सर्वात यशस्वी उद्योजिकांपैकी एक
बी. के. गोएंका हरिणायाचे असून त्यांची पत्नी दीपाली गोएंका वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 'फोर्ब्स'ने त्यांना आशियामधील 16 व्या सर्वात शक्तिशाली बिझनेस वुमन म्हणून निवडलं आहे. गोएंकांना राधिका आणि वंशिका या दोन मुली आहेत.