मुंबई : मार्च महिन्याचे बिल १५ मे पर्यंत, तर एप्रिल महिन्याचे बिल ३१ मे पर्यंत भरण्याची सवलत सरकारकडून देण्यात आली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे. घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रिडींग घेण्यात येणार नसून मागील महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज बिल तयार करण्यात येणार आहे. ग्राहकाशी थेट संपर्क होऊ नये याकरिता मीटर रिडींग, वीजबिल वितरीत करणे, वीज बिल भरणा केंद्र, वीज चोरी मोहिम, वीज पुरवठा खंडित करणे इत्यादी प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. तसेच लॉकडाऊनमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सरकारने अशा लोकांना देखील दिलासा दिला आहे. 


देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्त्वाचे पाऊलं उचलली जात आहे. लोकांना घरातच राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून सतत होत आहे. रोज कोरोनाचे वाढते रुग्ण हा चिंतेचा विषय बनला आहे.