मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा आणि टॅक्सी (rickshaw and taxi) भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा आणि तद्पर्यंत सुधारित अधिकृत टॅरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. (Extension till 31st August 2021 for recalibration of rickshaw and taxi fare meters)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या 22 फेब्रुवारी 2021 रोजीच्या बैठकीत ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला व या भाडेवाढीकरिता ऑटोरिक्षा, टॅक्सी यांचे मिटर रिकॅलिब्रेशन करणेकरिता  31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती व तोपर्यंत सुधारित टॅरिफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑटोरिक्षा, टॅक्सी मिटर रिकॅलिब्रेशनचे कामकाज 15 एप्रिल 2021 पासून होऊ न शकल्याने ऑटोरिक्षा, टॅक्सी मिटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठीची मुदत 31ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात यावी असा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या 31 मे 2021रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेण्यात आलेल्या बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ही मुदतवाढ देण्यात आली आहे.


सर्व ऑटोरिक्षा व टॅक्सी मालक, चालक यांनी ब्रेक द चेन अंतर्गत शासनाच्या निर्णयाशी अधीन राहून विहित कालावधीमध्ये ऑटोरिक्षा आणि टॅक्सी मीटरचे रिकॅलीब्रेशन करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.