मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव जस जसा वाढतोय तस तसा अफवांना चेव फुटत आहे. सोशल मीडियावर अफवांना उधाण आलं आहे. असाच एक मॅसेज फॉरवर्ड होत आहे. ज्यामध्ये मासिक पाळीच्या काळात कोरोना लस टोचू घेणं अत्यंत घातक असल्याचं म्हटलं आहे. (Fact Check : Corona vaccine safe during monthly periods, Fall rumours about menstruation )  हा मॅसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 


काय आहे या मॅसेजमध्ये ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 मे पासून 18 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी लस उपलब्ध होत आहे. प्रत्येक मुलीने आपल्या मासिक पाळीची तारीख तपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या. मासिक पाळी दरम्यान इम्युनिटी कमी असते. त्यामुळे मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नका. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यावर तुमची इम्युनिटी कमी होते आणि नंतर ती वाढते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान कोरोना लस घेणं घातक ठरू शकते. 



Fact Check - कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित 


मासिक पाळीच्या दिवसातही लस घेणे पूर्ण सुरक्षित आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस कोणत्या वेळेत घेणे, अशी कोणतीच गाईड लाईन नाही. अगदी मासिक पाळीच्या दिवसातही लस घेणे पुर्ण सुरक्षित आहे. कोरोना लस ही तुम्ही कधीही घेऊ शकता अगदी मासिक पाळीच्या दिवसातही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे एमडी डॉक्टर शिल्पा लाड यांनी सांगितले आहे. 


मासिक पाळी आणि प्रतिकारशक्ती याचा काहीच संबंध नाही. मासिक पाळीच्या आधी अथवा नंतर कधीही लस घेणे सुरक्षित असणार आहे. 18 वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी. लस घेताना फक्त आपल्याला कोणत्या औषधाची ऍलर्जी किंवा काही आजार असल्यास डॉक्टरांचा पहिला सल्ला घ्यावा.