मुंबई : व्हायरल पोलखोल या आमच्या विशेष कार्यक्रमातून आम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक फॉरवर्ड व्हीडिओची सत्यता समोर आणतो. दररोज अनेक व्हीडिओ आणि मेसेजेस खोट्या दाव्यासह व्हायरल केले जातात. मात्र ते खरे नसतात. पण काही जण त्या व्हीडिओची किंवा मेसेजची खातरजमा न करता आला तसा फॉरवर्ड करतात. (fact check of viral message
gang out of mall for kidnapping of people)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक मेसेज व्हायरल होतोय. मॉलमध्ये जात असाल तर तुमचं अपहरण होऊ शकतं, असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आम्ही या व्हायरल होणाऱ्या मेसेजची सत्यता पडताळून पाहिली.



फेक मेसेजमध्ये काय?


मॉलबाहेर अपहरण करणारी टोळी फिरतेय. ही टोळी अत्तर आणि सेन्टचा वास घेण्यास भाग पाडते आणि बेशुद्ध करते. त्यानंतर अपहरण करुन मग लुटमार करतात. आतापर्यंत 7 मुलीचं अपहरण केल् आहे. असा मेसेज व्हायरल होतोय. हा दावा केल्याने सर्वसामान्यांमध्ये भितीचं वातावरण आहे. 


या व्हायरल मेसेजनुसार मॉलबाहेर अशी कोणती टोळी फिरतेय का, तसेच या टोळीने आतापर्यंत कोणाचं अपहरण केलंय का, याचा पोलखोल करण्याचा प्रयत्न आम्ही केला. 


काय खरं काय खोटं? 


पोलिसांच्या नावाने फिरणार हा मेसेज खोटा असल्याचं समोर आलं. मॉलबाहेरुन मुलींचं अपहरण झाल्याची कोणतीही बातमी नाही. इंग्रजीमध्ये या अफवेला 'द नॉकआऊट पर्फ्यूम असं नाव आहे.  


"लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या हेतूने हा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. अशी कोणतीही टोळी सक्रिय नाही. त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. तसेच संशयास्पद असं काही नजरेस पडलं तर पोलिसांना त्याची कल्पना द्या", असं आवाहन पोलिसांनी केलंय.


दरम्यान मॉलबाहेर अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याचा दावा  आमच्या पडताळणीत असत्य ठरला.