Fact Check | जास्त बॅंक अकाऊंट्समुळे मोठ्ठं नुकसान होतं?
तुमचं बँकेत खातं आहे का? कारण, एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.
मुंबई : तुमचं बँकेत खातं आहे का? कारण, एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. पण, पैसे सुरक्षित राहावेत म्हणून बँकेत ठेवतो. मग सुरक्षित का नाहीत? आम्ही याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं हे आपण जाणून घेऊयात. (fact check viral polkhol 2 bank account not safe know what truth what false)
आपले पैसे सुरक्षित राहावेत यासाठी आपण बँकेत पैसे ठेवतो. सॅलरी, सेव्हिंग आणि करंट असे तिन्ही अकाऊंट वेगवेगळे. अशी एकापेक्षा जास्त अकाऊंट आपली असतात.
पण एकापेक्षा जास्त अकाऊंट असल्यामुळं आपलंच आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा दावा करण्यात आला आहे. यामुळं अनेक खातेदारांच्या मनात भीती निर्माण झालीय. आपलेच पैसे आणि आपल्यालाच का नुकसान असेही प्रश्न अनेकांनी विचारलेयत. पण, आता व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहा.
असा आहे व्हायरल मेसेज
एकापेक्षा जास्त अकाऊंट असतील तर नुकसान होऊ शकतं. अनेकजण आपले आर्थिक व्यवहार 2 किंवा अधिक बँकांमधून करतात. पण एकापेक्षा जास्त अकाऊंट असणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अरुण मेहेत्रे हे तज्ज्ञांना भेटले. त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
त्यामुळं आमच्या पडताळणीत नक्की काय समोर आलं हे आपण पाहुयात.
व्हायरल पोलखोल
सर्व खात्यांचे स्टेटस सतत बघणं आवश्यक. सर्व खात्यांची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते. अनेक खाती असल्यामुळं पैसे अडकून पडतात, त्याला व्याजही कमी मिळतं. काही बँका खात्यासाठी शुल्कही आकारतात. वेगवेगळ्या बँकात खाती असली तरी काळजी घेतल्यास धोका नाही.
ग्राहक आपल्या सोयीनुसार बँकेत खाती उघडतात. रक्कम सुरक्षित रहावी यासाठी वेगवेगळ्या बँकेत खाती ठेवतात. पण, पैशांचा व्यवहार पारदर्शी केला तर काहीही धोका नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत अधिक बँक खाती असतील तर नुकसान होतं हा दावा असत्य ठरला.