Viral Video : बातमी आहे एका व्हायरल बाप्पाची. तुम्ही कधी बसलेला बाप्पा उठून उभा राहून दर्शन देताना पाहिलंय का? पाहिलं नसेल तर आज हा बाप्पा पाहा. चक्क भक्तांना उभा राहून दर्शन देतोय. कुठे आहे हा बाप्पा. चला पाहूयात. (fact check viral polkhol ganpati bappa standing darshan know what true what false)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश उत्सव सुरू झालाय. अशातच एका बाप्पाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा बसलेला बाप्पा चक्क भक्तांना उभं राहूनच दर्शन देतो. भक्ताने बाप्पाच्या पायावर हात ठेवून नमस्कार केला की हा बाप्पा स्वतः उभा राहतो आणि भक्ताला आशीर्वाद देतो. हा व्हिडिओ बघा या भक्तानं बाप्पाच्या चरण स्पर्श केला. त्यानंतर लगेचच हा बाप्पा उभा राहतो आणि या भक्ताला दर्शन देतो. 



याआधी कधीही असा बाप्पा तुम्ही पाहिला नसेल पण या व्हिडिओत पहा हा बाप्पा चक्क उभा राहून दर्शन देत असल्याने व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय. पण हा बाप्पा कसा उभा राहतो हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तेही आम्ही सांगणार आहोत. हा कुठे आहे आणि कुणी बनवला.? याची आम्ही व्हायरल पोलखोल केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया.
 
हा बाप्पा साता-यातील असल्याचं बोललं जातंय. बाप्पा उभा राहावा यासाठी मशीन लावण्यात आली. बाप्पाच्या पायाला बटण लावण्यात आलेय. पायाला लावलेलं बटण दाबलं की बाप्पा उभा राहतो. 


हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या बाप्पाला पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. चक्क बाप्पाच थेट उभा राहून दर्शन देत असल्याने भाविकांनीही या बाप्पाचं दर्शन घेतलं. हा बाप्पा साकारणाऱ्या मूर्तीकाराचं आता कौतुक होतंय.