Viral Message Fact Check : 2050 सालापर्यंत मुंबईतून मरीन ड्राईव्ह (Marine Drive) गायब होणार. त्यापाठोपाठ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (Western Express), वांद्रे-वरळी सी (Bandra–Worli Sea Link) लिंक बुडणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मरीन ड्राईव्ह आणि चेन्नईचा मरीना बीच (Chennai Marina Beach) काही वर्षात आणखी छोटा होईल असा दावा केल्यानं भीती निर्माण झालीय. व्हायरल मेसेजमध्ये (Viral Message) काय दावा केलाय पाहुयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल मेसेज
2050 पर्यंत मुंबईत (Mumbai) काही घरांमध्ये पाणी शिरेल, राहण्यासाठी जागाही उरणार नाही. शहरांची परिस्थिती आणखी बिकट होणार. मुंबईत कमीत कमी 1 हजार पेक्षा अधिक इमारती धोक्यात येतील. या दाव्याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबद्दल अधिक माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात. 


हे ही वाचा : टेन्शन वाढलं! पुण्यात नव्या विषाणूची एन्ट्री, ही लक्षणं आढळल्यास सावधान


व्हायरल पोलखोल
RMSI च्या संशोधनानुसार, 2030 पर्यंत समुद्र किनाऱ्याचा भाग कमी होणार 
2050 पर्यंत समुद्राचं पाणी थेट शहरांमध्ये घुसणार 
मरीन ड्राईव्ह, वरळी सी-लिंक बुडणार असल्याची भीती 
क्लायमेंट असेसमेंट रिपोर्टनुसार हा दावा करण्यात आलाय
मुंबईच नव्हे तर कोच्ची, मंगळुरू, चेन्नईला धोका आहे



हे ही वाचा : Student of the Year : विद्यार्थ्याने कबीरदास यांच्यावर लिहिला निबंध, सोशल मीडियावर व्हायरल


ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) समुद्रातील पाण्याची पातळी वाढतोय. तापमानात वाढ झाल्याने हिमनगही वितळतायत. यासोबतच अवैध खोदकाम सुरू असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. त्यामुळे भविष्यात मुंबईचा मरीन ड्राईव्ह पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.