Viral News: विद्यार्थ्याने कबीरदास यांच्यावर लिहिला निबंध, सोशल मीडियावर व्हायरल

Viral News: विद्यार्थ्याने लिहिलेल्या उत्तराने शिक्षक हैराण, सोशल मीडियावर दोन गट... उत्तरपत्रिका होतेय तुफान व्हायरल

Updated: Dec 2, 2022, 01:27 PM IST
Viral News: विद्यार्थ्याने कबीरदास यांच्यावर लिहिला निबंध, सोशल मीडियावर व्हायरल

Student Wrote Eassay on Sant Kabir goes Viral : परीक्षेत चांगले गुण मिळावेत यासाठी विद्यार्थी (Student) वर्षभर कठोर मेहनत घेतात. काही विद्यार्थी तर रात्रंदिवस अभ्यास करतात, पण काही विद्यार्थी असे असतात जे वर्षभरही अभ्यास करत नाहीत. मग परीक्षेत प्रश्नांची उत्तरं आली नाहीत की उत्तरपत्रिकेवर वाट्टेल ते लिहितात. सोशल मीडियावर (Social Media) याआधीही अशा अनेक उत्तरपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका उत्तरपत्रिकेने लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे. 

हिंदीच्या पेपरमध्ये विचारण्यात आला होता प्रश्न
सोशल मीडियात व्हायरल होणारी ही उत्तरपत्रिका एका शाळेच्या सामाहिक परीक्षेतील आहे. उत्तरपत्रिकेवरुन हा आठव्या इयत्तेचा हिंदी विषयाचा पेपर असल्याचं दिसतंय. पेपरमध्ये दोन प्रश्न विचारण्यात आले होते. यातला एक प्रश्न होता कबीरदास (Kabirdas) यांच्यावर निबंध लिहा. तर दुसरा प्रश्न होता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर लेख लिहा. यावर विद्यार्थ्याने लिहिलेल्या उत्तराने शिक्षकांनीही आपल्या डोक्यावर हात मारून घेतला असेल.

विद्यार्थ्याचं भयानक उत्तर
कबीरदार यांच्यावर निबंध लिहा, या प्रश्नाचं उत्तर लिहिताना विद्यार्थ्याने पेपरवर कबीरदास असं लिहिलंय आणि त्यावर निबंध लिहिलंय. तसंच अमिताभ बच्चन यांच्यावरही कथा असं लिहून आपलं उत्तर पूर्ण केलं आहे. 100 मार्कांच्या या पेपरसाठी शिक्षकाने या विद्यार्थ्याला शुन्य मार्क दिले आहेत. या उत्तरपत्रिकेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. 

सोशल मीडिआवर दोन गट
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या उत्तरपत्रिकेमुळे युझर्समध्ये वाद उभा राहिला आहे. काही युझर्सने मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जणांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. आठवीच्या विद्यार्थ्याला दोन ओळी लिहिता येऊ शकत नाहीत, ही गंभीर गोष्ट असल्याचं युझर्सने म्हटलं आहे.