फडणवीस-शिंदे सरकार! नवीन सरकारचा आजच होणार शपथविधी; राजभवनात जय्यत तयारी सुरू
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे
मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आज एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत. फडणवीस-शिंदे सरकारचा आजच शपथविधी होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गोव्यातून एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करून आजच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी राज भवनाच्या दरबार हॉलमध्ये 7.30 वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप कडून हे शपथ घेण्याची शक्यता
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीष महाजन
शिंदे शिवसेना गटाचे हे मंत्री उद्या शपथ घेऊ शकतात
उदय सामंत
तानाजी सावंत
संजय शिरसाट - किंवा संदीपान घुमरे