मुंबई : दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येबद्दलची अंत्यत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्थानिक पोलिसांना आलेल्या अपयशांतर तसेच घटनेच गांभीर्य पाहता या दोघांच्याही मारेक-यांचा शोध घेण्यास सीबीआय आणि सीआयडीला पाचारण करण्यात आलं होत. पण या तपासात आपण सपशेल अपयशी ठरल्याचे सीबीआय आणि सीआयडीने सांगितले. मुंबई हायकोर्टासमोर त्यांनी ही कबुली दिली आहे. आता फिल्ड वर्क करुन काही होईल अशी आशा नाही असेही सांगण्यात आले. जो काही तपास आहे तो शास्त्रीय पद्धतीनं संशोधन करणं आणि पुरावे मिळवणं यातूनच होऊ शकेल अशी माहिती सीबीआय आणि सीआयडीने मुंबई हायकोर्टासमोर दिली आहे.