मुंबई : पश्चिम रेल्वेचे चर्चगेट रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असून रेल्वे स्टेशन आम्ही उडवून देऊ अशी धमकी देणारा निनावी फोन आज सकाळी १०.४० वाजता आरपीएफ कंट्रोल रुम येथे आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आरपीएफ, जीआरपी आणि विविध तपास यंत्रणांनी चर्चेगेट रेल्वे स्टेशनवर धाव घेत चर्चेगेट रेल्वे स्थानकावर शोध कार्य सुरु केले. श्वान पथकाच्या सहाय्याने स्थानकाचा कोपरा न कोपरा पिंजून काढला. 


एटीएसने देखील या निनावी फोनची गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली. मात्र अखेर तपासाअंती ही अफवा असल्याचे समोर आले.