मुंबई : मुंबई 1993 बॉम्बस्फोट निकालावर पीडितांच्या कुटुंबीयांनी काहीसं समाधान व्यक्त केलं आहे. असं असलं तरी पीडितांकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील १२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी अबू सालेम विशेष टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र ही शिक्षा केवळ २५ वर्षांपर्यंत आहे. पोर्तुगाल सरकारसोबत केलेल्या करारानुसार अबू सालेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्यामुळं सीबीआयच्या वकिलांनी जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली. मात्र पोर्तुगाल सरकारच्या कायद्यानुसार ही शिक्षा २५ वर्षांपर्यंत देणं बंधनकारक आहे. त्यामुळं अबू सालेमला २५ वर्षांचा कारावास झाला आहे.


सालेमनं त्यातल्या १२ वर्षांचा तुरूंगवास आधीच भोगला आहे. त्यामुळं त्याला आता केवळ १३ वर्षे तुरूंगात काढावी लागण्याची शक्यता आहे. मात्र भारत सरकारनं पोर्तुगाल सरकारशी यासंदर्भात चर्चा केल्यास त्याची शिक्षा वाढू शकत असल्याची माहिती सीबीआयचे वकील दीपक साळवे यांनी दिली आहे.