मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, अर्थात राज्यात कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या आकडेवारीनुसार 1 कोटी 4 लाख 97 हजार 959 शेतक-यांनी या कर्जमाफी योजनेसाठी नोंदणी केली. यापैकी  58 लाख 29 हजार 360 शेतक-यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. 


आता ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करताना काही अटी घातल्या आहेत. 


या अटी आणि शर्तींची पूर्तता न करणारे अर्जदार बाद केले जातील. तर जे पात्र शेतकरी ठरतील त्यांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.