शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर
शेतक-यांचा महामोर्चा आज ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाका मार्गावरुन मुंबईत प्रवेश करणार आहे.
मुंबई : शेतक-यांचा महामोर्चा आज ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाका मार्गावरुन मुंबईत प्रवेश करणार आहे.
यावेळी मुंबईत वाहतुकीचा बोजवारा उडू नये यासाठी, मुंबई पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन केलं आहे. शेतक-यांचा महामोर्चा आज ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाका मार्गावरुन मुंबईत प्रवेश करणार आहे. यावेळी मुंबईत वाहतुकीचा बोजवारा उडू नये यासाठी, मुंबई पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन केलं आहे.
मोर्चा मुंबईच्या सीमेवर
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर पोहोचला आहे. हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेले हे लाल वादळ शनिवारी रात्री ठाणे शहरात दाखल झाले. मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आता हे शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार असून, त्यामुळे सोमवारी मुंबईतील रस्ते जाम होण्याची शक्यता आहे.
विधान भवनाच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या या मोर्चाला आता विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळू लागला असून, शिवसेना आणि मनसेने मोर्चाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चेकऱ्यांशी फोनवरून संवाद साधला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांची व्यवस्था केली असून, हा महामोर्चा मुंबईत दाखल झाल्यावर मनसेकडून चेंबूर येथे मोर्चाचे स्वागत होणार आहे.