मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत‍ शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याच्या  कामाला वेग देण्यात येणार आहे. तसेच  अर्ज भरण्यासाठी दिलेली बायोमेट्रिक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत राहील याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफी अर्ज भरण्याची कार्यवाही आता ‘मिशन मोड’वर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगीतलं. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत असून शेतक-यांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यावेळी  शेतकरी कर्जमाफी आणि राज्यातील खऱीप पीकाचा  आढावा घेण्यात आला.


कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रे' अधिक प्रभावीपणे कार्यरत ठेवावीत. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, सर्व यंत्रणा गतिमान करावी. कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सेवा केंद्रांकडून प्रती अर्ज १० रुपये शुल्क आकारले जाते.मात्र यापेक्षा अधिक शुल्क आकारल्याच्या तक्रारी आल्यास अशा सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


बायोमेट्रिक यंत्रणेमध्ये तांत्रिक त्रुटी असलेल्या त्या तात्काळ  दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.  शेतकरी कर्जमाफीचे सर्वाधिक अर्ज नोंदणी  जळगाव जिल्ह्यात झाली आहे.