शेतकरी कर्जमाफीची मागणी म्हणजे फॅशन-नायडू
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून देशात रान पेटलेलं असताना केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंनी केलेल्या विधानामुळं आणखीनंच वाद भडकण्याची शक्यता आहे.
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून देशात रान पेटलेलं असताना केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंनी केलेल्या विधानामुळं आणखीनंच वाद भडकण्याची शक्यता आहे. कर्ज काढणं ते माफ करण्याची मागणी करणं ही आजकाल फॅशन होत चालली असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी केलं आहे.
कर्जमाफी हा काही अंतिम तोडगा नसल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. नायडूंच्या विधानाचा काँग्रेसनं समाचार घेतला आहे. जर कर्जमाफीची मागणी फॅशन आहे तर निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देताना याचा विचार करायला हवा होता, अशी टीका काँग्रेसनं केली आहे.