शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला
शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला आहे. हा लॉंग मार्चचा हा शेवटचा टप्पा असून आज हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.
मुंबई : शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला आहे. हा लॉंग मार्चचा हा शेवटचा टप्पा असून आज हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.
शेतकरी मध्यरात्री आझाद मैदानात
शेतकरी मोर्चा सध्या सोमय्या मैदानामध्ये असून मध्यरात्री १२ नंतर मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघाला. १०वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, त्यांना अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं अजित ढवळे यांनी सांगितलं.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.
आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
या समितीमध्ये एकूण ६ मंत्री असतील. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख हे मंत्री या समितीमध्ये असतील.
विशेष सुविधा
आंदोलक शेतकऱ्यांसाठी शामियाना उभारण्यात आलायं तसेच शेतकऱ्यांसाठी ४० फिरत्या शौचालयाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सेवभावी संस्थांकडून जेवण तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली.