COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राष्ट्रीय किसान माहासंघाने घोषीत केलेल्या शेतकरी संपाचा आजचा तिसरा दिवस असून आता या संपाचा फटका सामान्यांना बसण्यास सुरुवात झालीये. शेतकरी संपामुळे शेती मालाची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम हा भाज्यांच्या किंमतींनवर झाला आहे.


दादरच्या भाजी मंडईत भाज्यांची आवर ही ५० टक्क्यांनी घटलीये. त्यामुळे भाज्यांचे भाव जवळपास दुपटीने वाढले आहेत.


नाशिकमध्ये उत्स्फूर्तपणे बंद


किसान महसंघाचं शेतमाल विक्री आंदोलन देशभरात पेटलंय. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कुठल्याही सक्षम नेतृत्वाविना उस्फूर्तपणे दोन दिवस बंद पाळलाय. त्यामुळे पिंपळगाव, लासलगाव येथे कांद्याची आवक ऐंशी टक्के घटलीये. नाशिक बाजारसमितित ही भाजीपाल्याची आवक आणि दूध संकलनावर परिणाम दिसून आलाय. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वत्र पोलीस तैनात केले असून शेतकऱ्यांनी निर्भयपणे आपला माल बाजारात आणावा असं आवाहन केलंय.