मुंबई : कर्जमाफी आणि हमीभाव मागणीसाठी शेतकरी पुन्हा संपावर जाण्याची शक्यता आहे. शेतकरी सुकाणू समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेय. १ मार्चपासून राज्यात असहकार आंदोलनाचा इशारा यांनी यावेळी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीनं पुन्हा एकदा आंदोलनचा इशारा दिलाय. सरकारनं कर्जमाफीचं वाटोळं केलं असून हमीभावही मिळत नाही. त्यामुळे १ मार्चपासून असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा सुकाणू समितीनं दिलाय.


याबाबत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलंय. असहकार आंदोलनात कर्जाचे हप्ते तसंच विजेचं बिल भरण्यात येणार नाही. तसंच शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारतील, असा इशाराही सुकाणू समितीने यावेळी दिला. त्यामुळे राज्य सरकारची शेतकरी प्रश्नावर कोंडी होऊ शकते. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.