दीपक भातुसे / मुंबई : मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या सरपंच दरबारात महिला सरपंचांच्या पतीराजांनीच गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. 


मंत्रालयात सरपंच दरबार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मंत्रालयात हा सरपंच दरबार भरवला जातो. त्यानुसार आज सरपंच दरबारासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातून सरपंच आले होते. 


पतीरांना प्रवेश बंदी


यात महिला सरपंचाचा सहभागही होता. महिला सरपंचांसोबत त्यांचे पतीदेखील मंत्रालयात आले होते. मात्र या पतिराजांना सरपंच दरबारात प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यांनी दरबारात जाण्यासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गोंधळ घातला. 


मोजक्याच सरपंचाना निमंत्रण


सभागृहाबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या गोंधळ घालणाऱ्या पतीराजांना तेथून बाहेर काढले. सरपंच दरबारासाठी राज्यातील ठराविक सरपंचाना निमंत्रित करण्यात येते. 


अडचणी समजून घेण्यासाठी...


राज्यातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करणाऱ्या सरपंचांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात आणि सरकारने काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी सरपंच दरबार भरवण्यात येतो.