राज्य सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, राज ठाकरेंचे आदेश
मनसे कार्यकर्त्यांकडून ऊर्जा मंत्री आणि राज्य सरकार विरोधात तक्रार
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया,मुंबई : वाढीव वीज बिलाबाबत यूटर्न घेणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलेयत. या आदेशनानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केलीय. महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून ऊर्जा मंत्री आणि राज्य सरकार विरोधात तक्रार करण्यात येतेय.
वाढीव वीज बिल कमी व्हावे यासाठी मनसेने या पूर्वी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार केला होता. मनसे कार्यकर्त्यांनी खळखट्याक आंदोलन देखील केले होते. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही वाढीव वीज बिल मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची भेट घेतली होती.
काही दिवसांपूर्वी वीज बिल थकबाकी वसुल करा आणि जे थकबाकी देणार नाहीत त्यांची वीज खंडित करा असा आदेश ऊर्जा विभागाने दिले आहे त्या नंतर मनसे आक्रमक झाली आहे.
अडथळ्यांची शर्यत करायची आणि गती मोजायची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा"आमची सत्ता रस्त्यावर" असं महाराष्ट्र सैनिक म्हणतात त्यामागे "सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरून लढाई जिंकू शकतो" हा विश्वास असतो. प्रजासत्ताक दिनी वाढीव विजबिलांच्या प्रश्नावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि महावितरण, बेस्ट, अदानी, टाटा या वीज कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करताना हीच भावना आमच्या मनात असल्याचे मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगितले. सरकारी मान्यतेने राज्यातील जनतेची जी आर्थिक लूट होतेय, त्याविरोधातला हा संतप्त आक्रोश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित प्रजासत्ताकाची निर्मिती आपण खरंच करू शकलो असू तर पोलीस या लुटारुंविरोधात गुन्हे नोंदवतील असेही ते पुढे म्हणाले.