निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पवारांचे नाव दाऊदशी जोडल्याचा वाद
NILESH RANE | NITESH RANE | आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहीमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश नारायण राणे जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगली घडतील असे भाष्य करणे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल राणे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी आझाद मैदान येथे गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हटले होते निलेश राणे
अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाही, काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस आहेत असा मला संशय आहे, असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले होते.