PMC Bank Scam : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक
पीएमसी (PMC) बँक घोटाळा प्रकरणात रजनीत सिंग यांना अटक केली आहे.
मुंबई : पीएमसी (PMC) बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज शनिवारी रजनीत सिंग यांना अटक केली आहे. बॅंक घोटाळ्यात ( PMC Bank Scam ) अटक करण्यात आलेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. रजनीत सिंग पीएमसी बँकेचे माजी संचालक आहेत. ते माजी भाजप आमदार तारा सिंग यांचे पुत्र आहेत. त्यामुळे विरोधकांकडून याप्रकरणी भाजपला टार्गेट करण्याची शक्यता आहे.
सुमारे ४०० कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात या आठवडयाच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली होती.पीएमसी बँकेत घोटाळा झाला त्यावेळी जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घोटाळयात बँकेचे मोठे अधिकारी गुंतल्याची माहिती पुढे आली आहे.
बँकेतील अनियमितता लपविण्यामध्ये जयेश आणि केतन या दोघांची भूमिका महत्वाची असल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.