मुंबई : लॉकडाऊन दरम्यान आणि अनलॉक मध्ये राज्यात कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 74 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तर 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून त्यांच्याकडून 29 कोटी 37 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 मार्च ते 2 आक्टोंबर दरम्यान 2,73,604 गुन्ह्यांची नोंद झाली असून 39,004 व्यक्तींना अटक करण्यात आली. 96,532 वाहने जप्त केली गेली. विविध गुन्ह्यांसाठी 29 कोटी 37 लाख 76 हजार 782 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 369 घटना घडल्या असून त्यात 898 व्यक्तींना, ताब्यात घेतले गेले असून कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
 
राज्यात आतापर्यंत 225 पोलीस आणि 25 अधिकारी अशा एकूण 250 पोलीस कर्मचारी/अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.