मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने फिरंगी सिनेमाची निर्मिती केली आहे, हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे कपिलच्या के९ फिल्मसची ही पहिली फिल्म आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलचा तिरंगा या सिनेमाचा प्रोमो काही दिवसाआधी रिलीज करण्यात आला. यानंतर आता सिनेमाचं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.


हे 'साहिबा रूस गईया', कपिल आणि इशिता दत्तावर चित्रित करण्यात आलं आहे.



या गाण्याचे बोल खूप चांगले आहेत, लोकांना अतिशय पसंद येणारे आहेत,  या गाण्याचा व्हि़डीओ देखील खूप छान आहे, या गाण्याला राहत फतेह अली खान यांनी गायलं आहे, लिरिक्स डॉ. देवेंद्र काफिर यांनी लिहिले आहेत.


सिनेमाची कहाणी ही इंग्रजांच्या काळातील आहे, कपिल ब्रिटीश राजवटीतील गुलामाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सिनेमा, फ्लॅशबॅक पासून सुरू होताना दिसतो.


यात कपिल एका लहान मुलीला इंग्रजांच्या काळातील एक कहाणी ऐकवत असतो. ज्यात एक युवक आहे, मंगा. मंगाला इंग्रज वाईट वाटत नाहीत, हा सिनेमा २५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.