माहुलगाव हादरलं, भारत पेट्रोलियम रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट
चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट झाला. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मुंबई : चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, चार ते पाच कामगार या स्फोटात जखमी झाले असून आणखी काही कामगार आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
मोठा स्फोट झाल्याने काही किलोमीटरचा परिसर या हादरला त्यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते. अग्निशमन दलाच्या २० गाडया आग विझवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुपारी तीन वाजता हा स्फोट झाला. रिफायनरमधील बॉयलरचा स्फोट होऊन आग भडकली. बीपीसीएलचा अग्निशमन विभाग आणि मुंबई अग्निशमन दल ही आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
दरम्यान, येथे झोपडपट्टीचा परिसर असल्याने खबरदारी म्हणून या झोपडपट्टीतल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.