COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईच्या विरार स्टेशनवर ओवर हेड वायरला आग लागली. संध्याकाळी ५.४५ वाजता  ही घटना घडली.  रेल्वे प्लॅटफॉर्मवर असताना ही आग लागली. यामध्ये सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. मुंबईकरांचा आजचा दिवस त्रासदायकच ठरला. सकाळी सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल कोसळला. आणि एकच गोंधळ उडला. 


पश्चिम रेल्वेची वाहतूक तेव्हापासूनच ठप्प आहे. तिकडे पूर्व उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानं सायन, माटुंगा, भांडुपच्या सखल भागात पाणी शिरलं होतं. सायनमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यानं मध्यरेल्वेच्या लोकल वाहतूकीवरही परिणाम झाला. दोन्ही रेल्वे मार्गांवर खोळंबा झाल्यानं अर्थातच लोक रस्त्यानं प्रवासाला निघाले... आणि रस्ते वाहतूकीचेही तीन तेरा वाजले.