मुंबई : शहरातील साकीनाका दुकान आग प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. फरसाण दुकानाचा मालक रमेश भानुशाली याला अटक करण्यात आली आहे.


विना परवाना व्यवसाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याला मृत्यूप्रकरणी कारणीभूत ठरविण्यात आलेय. तसेच विना परवाना स्फोटके बाळगणे आणि महापालिकेच्या काद्यानुसार विना परवाना व्यवसाय करणे अशा गुन्ह्याखाली भानुशाली याला अटक करण्यात आली आहे.


 १२ जणांना होरपळून मृत्यू


मुंबईतील साकीनाका परिसरात एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत जवळपास १२ जणांना होरपळून मृत्यू झाला. पहाटे साडे चारच्या दरम्यान ही आग लागली होती. अग्निशमन दल या घटनास्थळी पोहोचले होते. पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. या दुकानात काम करणाऱ्या १२ कामगारांचा या आगीत मृत्यू झाला आहे.


कामगारांना बाहेर पडता आले नाही


आग लागल्यानंतर दुकानावरचा स्लॅप या कामगारांवर कोसळला. दुकानातून बाहेर पडण्याची संधी देखील या कामगारांना मिळाली नाही. त्यामुळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बाहेर झोपलेले कामगार या मोठ्या दुर्घटनेतून वाचलेत.