अंधेरीत रोल्टा कंपनीला भीषण आग
अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : अंधेरी पूर्वमधील सिप्झ एमआयडीमधील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला भीषण आग लागली होती. दुसऱ्या मजल्यावरील सर्व्हर रुमला आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अनेक ताासंपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अखेर ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.
ही आग लेवर ३ प्रकारची असल्याचे सुरुवातीला अग्निशमन दलाने सांगितले होतं. मात्र, ही आग आणखीनच भडकत गेली. त्यामुळे अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरु होते. तीन जखमींवर ईएसआयसी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ही इमारत एमआयडीसी कॉम्प्लेक्समधील आहे. सुदैवाने या इमारतीत कोणीही अडकलं नसल्याची माहिती आहे. या इमारतीजवळील अंतर्गत रस्ता बंद करण्यात आला होता.
सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सांगण्यात आलं होतं.