मुंबई : नागपाडा कामाठीपुरा परिसरात इमारतीला आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहे. आग लागताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या रवाना झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या दरम्यान नागपाडा - कामाठीपुरा परिसरातील चायना इमारतीला आग लागली आहे. आग लागताच या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. या इमारतीत कुणी अडकल्याची अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. 



पण मुंबईतील कामाठीपुरा हा परिसर अतिशय गजबजलेला असतो. एवढंच नाही तर या परिसरात अतिशय चिंचोळी रस्ते आहेत. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला थोड्या अडचणी येत असल्याचं म्हटलं जातं आहेत. 


आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र सकाळीच कामाच्या वेळी लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अद्याप झालेली नाही. 



कामाठीपुरा येथील आगीत ५ जखमी असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.  यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. सर्वांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची ओळख पटली असून त्यांची नावे खालील प्रमाणे


इमारतीच्या आगीत जखमी झालेल्यांची नावे


20 वर्षीय मुलगा आदिल कुरेशी 
32 वर्षीय महिला निशा देवी
60 वर्षीय महिला चंदादेवी जखमी 
2 वर्षीय मुलगी  अनिया 
70 वर्षीय पुरूष मोहनराम