मुंबई: डोंबिवलीतील एका कंपनीला आग लागल्याचं वृत्त एएनआयट्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध करण्यात आहे. एमआयडीसी फेज 1 येथील झेनिथ कंपनीला रात्री उशीरा भीषण आग लागल्याची माहिती समोर येत असून, रबर बनवण्याची कंपनी असल्याचं स्पष्ट होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले फोटो पाहता ही आग मोठ्या प्रमाणावर लागल्याचं पाहायला मिळत होतं. 


दरम्यान, वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून त्यांना आगीवर ताबा मिळवण्यात यश मिळालं आहे.



भीषण स्वरुपाच्या या आगीत मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असून, कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं कळत आहे. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात असून, सध्या त्याप्रकरणीचा तपास सुरु असल्याचं कळत आहे.


मुख्य म्हणजे या आगीमुळे पुन्हा एकदा एमआयडीसीमध्ये असणाऱ्या कंपन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.